Overblog
Edit post Follow this blog Administration + Create my blog
 मन वेडा मी  @गजानन चोपडे

आईनंतर जर जगात जीव लावणारी आणि

आईनंतर जर जगात जीव लावणारी आणि जीव ओवाळून टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई पण फार काळ असू शकतनाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूणघालते. भावाची बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने प्रफुलीत असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं.. मी असंख्य उदाहरणे पाहिलीत व ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ पाहून थक्क झालोय. पोटची पोरगी असली की आईला मुलाची काळजी नसते. तिच्या पदरात मुलाला टाकून ती निर्धास्त होते. बहीण स्वत:ची व आईची अशा दोन्ही भूमिका निभावत असते. वडील असू देत, भाऊ असू देत, काका-मामा असू देत, मावश्या- आत्या असू देत; पण बहीण ती बहीण च असते. हे सगळे मिळून एका बहिणीची जागा कधीच घेऊ शकत नाहीत. भावाची काळजी करणे, त्याच्यासाठी नवसव उपासतापास करणे, त्याच्या यशासाठीप्रार्थना करणे, त्याच्या यशाने हरखून जाणे हे सगळे ती कोणी सांगायची वाट न पाहता स्वप्रेरणेने, मनापासून करीत असते.निसर्गाचा नियम आहे, सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ! भाऊबीज हा तिच्या लेखी वर्षातला सगळ्यात मोठा सण असतो. भाऊ जेवायला येणार म्हणजे काय लहानसहान गोष्ट आहे? ती आदल्या दिवशीपासून खपून त्याच्या आवडीचा मेनू करणार. अगदी आई करायची व तो तुटून पडायचा तसा. नवर्याने व मुलांनी त्या दिवशी मध्ये लुडबुडायचं नाही. एक दिवस एकट्या भावाचा. तो रक्षाबंधनाला येऊशकला नाही तर त्याच्या बचावार्थ झाशीच्या राणीच्या आवेशात हीच पुढे सरसावणार. मला या सगळ्या कोमल, हळव्या भावना कळतात @गजानन चोपडे

Share this post
Repost0
To be informed of the latest articles, subscribe:
Comment on this post